जिल्हा परिषद निवडणूक 2025–26 : नागरसूल गटातून संभाजी साहेबराव पवार रणांगणात
मजूर फेडरेशन नाशिक जिल्ह्याचे माजी चेअरमन व पंचायत समिती येवला चे माजी सभापती श्री. संभाजी साहेबराव पवार यांनी जिल्हा परिषद निवडणूक 2025–26 साठी नागरसूल गटातून उमेदवारी जाहीर केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण जिल्हा परिषद निवडणूक 2025–26 निमित्ताने चांगलेच तापले आहे. येवला तालुक्यातील नगरसूल गटातून श्री. संभाजी साहेबराव पवार यांनी अधिकृतरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.
संभाजी पवार हे नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन तसेच पंचायत समिती येवला चे माजी सभापती म्हणून कार्यरत राहिले आहेत. सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय असून, ग्रामीण भागातील विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
"विकासाचं वचन, विश्वासाचं नातं!" या घोषवाक्याखाली ते लोकांशी थेट संवाद साधत असून, त्यांच्या प्रचार मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस उपक्रम राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे.
संभाजी पवार म्हणाले, “विकास हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांचा विश्वास हीच माझी ताकद आहे आणि त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मी पुन्हा जनतेच्या सेवेत उतरलो आहे.”
त्यांच्या उमेदवारीमुळे नागरसूल गटातील राजकीय समीकरणांमध्ये नवचैतन्य आले असून, ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.



