Loading markets…

संजयनगर हिंदी मुंबई पब्लिक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश; १५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड

Written By LoksangharshMumbai
Published :

गोवंडी येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या संजयनगर हिंदी मुंबई पब्लिक स्कूलने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये ९५ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली. शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून शिक्षक, पालक आणि शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

संजयनगर हिंदी मुंबई पब्लिक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश; १५ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड
Share this news

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) – २०२६ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संजयनगर हिंदी मुंबई पब्लिक स्कूल, गोवंडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तसेच शाळेने ९५ टक्के निकाल नोंदवून उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.

गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रानीबानू मशरफ अन्सारी (राज्य रँक ४७), तस्नीम इसरार खान (५८), कु. पर्वी जितेंद्र राजपूत (६५), दिया मो. रिजवान अहमद खान (७२), जुबेर अल्फेज कासार (७३), हिमांशु रूपेश जैस्वार (७४), सायमा मिर्झारफ आजाज अन्सारी (८२), स्नेहा बाबूराव कदमकर (८३), लालबाबू रमजान अन्सारी (१०४), दिया ओमप्रकाश गुप्ता (१०५), सखीनाबानू शफीकुल इस्लाम (१४९), फारिक अख्तर जमाल अख्तर (१५१), मरियम फातमा मोहम्मद अली शाह (१६२), मो. फैहाद मो. साजिद अन्सारी (१७०) आणि अयान ताज मोहम्मद खान (२००) यांचा समावेश आहे.

या यशामागे मार्गदर्शक शिक्षक श्री. रमेश सावळे यांचे प्रभावी मार्गदर्शन, मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मी वि. पोटे यांचे नेतृत्व, शिक्षकांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांचा मोठा वाटा असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक तसेच विविध स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी कायम राहावी, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


Related News