चांदवड तालुका जिल्हा परिषद गटांची राखीव जागा जाहीर
Written By LoksangharshChandvad
Updated :
चांदवड तालुक्यात जिल्हा परिषद गटांची राखीव यादी जाहीर — दुगाव एससी, वडनेभैरव एसटी, तर तळेगावरोही ओबीसी राखीव.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चांदवड तालुक्यातील विविध गटांच्या राखीव जागांची घोषणा करण्यात आली आहे. प्रशासनाने जारी केलेल्या यादीनुसार खालीलप्रमाणे गटांची राखीव वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे —
दुगाव गट – अनुसूचित जाती (एससी) राखीव
वडनेभैरव गट – अनुसूचित जमाती (एसटी) राखीव
तळेगावरोही गट – इतर मागासवर्गीय (ओबीसी) राखीव
धोडंबे गट – इतर मागासवर्गीय (ओबीसी) राखीव
वडाळीभोंई गट – इतर मागासवर्गीय (ओबीसी) राखीव
या आरक्षणामुळे आगामी निवडणुकीत सामाजिक समतोल साधण्यास हातभार लागणार असून, स्थानिक पातळीवर उमेदवार निवडीची चुरस आता अधिक वाढण्याची शक्यता आहे.