शिक्षण विभाग सहकारी बँकेच्या मतदानाचा प्रचार शिगेला
शिक्षण विभाग सहकारी बँकेची निवडणूक 23 ऑगस्ट 2025 रोजी होत असून, समर्थ सहकार परिवर्तन पॅनलमुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील बहूसंख्य संख्येने शिक्षक सभासद असलेल्या शिक्षण विभाग सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक 2025 – 2030 हि शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी होणार असून त्याअनुषंगाने मतदानाचा प्रचार शिगेला पोहचलेला आहे . ह्यावर्षी प्रथमताच समर्थ सहकार परिवर्तन पॅनलसह अन्य दोन पॅनल निवडणूक रिंगणात असल्यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. प्रत्येक उमेदवार हा मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
समर्थ सहकार परिवर्तन पॅनलमुळे अन्य दोन पॅनलसमोर एक तगडे आव्हान निर्माण झालेले आहे . प्रत्यक्ष भेटी, स्नेहमेळावे या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रत्येक पॅनल प्रयत्न करीत आहे तसेच आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहचवत असले तरीही मतदार ह्यावेळेला कोणाला संधी देतात हे येणाऱ्या 23 ऑगस्ट 2025 रोजीच याचे चित्र स्पष्ट होईल.
शिक्षण विभाग सहकारी बँकेमध्ये जास्त प्रमाणात शिक्षक मतदार असून शिक्षकांची हक्काची बँक म्हणून या बँकेला ओळखले जाते बहुतेक शिक्षक या बँकेतून वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज घेत असतात परंतु सध्या कर्जाचे व्याजदर जास्त असल्यामुळे शिक्षकांचा इतर बँकेतून कर्ज घेण्याचा कल वाढलेला आहे. निवडून येणाऱ्या नवीन संचालकांनी या बाबीकडे लक्ष द्यावे हि सभासद असलेल्या प्रत्येक मतदाराची अपेक्षा आहे. – श्री. सुदर्शन एम. खंदारे ( प्र.शिक्षक )
शिक्षण विभाग सहकारी बँकेच्या दिनांक 23 ऑगस्ट 2025 होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल – श्री. पंकज गंगाधर शेळके ( प्र.शिक्षक )