बदलापूर येथील समर्थ सहकार पॅनल च्या मेळाव्यास मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँकेचे मतदान दिनांक 23 ऑगस्ट रोजी आहे त्यानिमित्ताने आज बदलापूर येथे समर्थ सहकार परिवर्तन पॅनल च्या वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँकेचे मतदान दिनांक 23 ऑगस्ट रोजी आहे त्यानिमित्ताने आज बदलापूर येथे समर्थ सहकार परिवर्तन पॅनल च्या वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते व त्या ठिकाणी सदर मेळाव्यास मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. सदर मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांणी आपले मनोगत व्यक्त केले व समर्थ परिवर्तन पॅनल च्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला.
आज झालेल्या मेळाव्यात पॅनल प्रमुख श्री. ऋषींकांत घोसाळकर यांनी अध्यक्ष स्थान भूषविले तसेच मंचावर श्री. सन्मा. जगदीश गायकवाड माजी विभाग निरीक्षक, सन्मा. मधुकर माळी माजी कनिष्ठ पर्यवेक्षक शारीरिक शिक्षण ,सन्मा. अनिल सनेर शा. शि. निरीक्षक, सन्मा. दिपक झाडे, सन्मा. मुंजा गिरी तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ पॅनल चे उमेदवार श्री. भगवान भुसारा ( अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग )तसेच मुख्याध्यापक शिवडी वडाळा मनपा मराठी शाळा यांनी केले व सूत्रसंचालन मोहन भोगाडे ( मुख्याध्यापक, माहीम पोलीस कॉलनी मराठी शाळा ) यांनी केले तसेच समर्थ सहकार परिवर्तन पॅनल च्या सर्व उमेदवार यांचा व्यक्तिगत तथा त्यांनी शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा उपस्थित सर्व शिक्षक तसेच इतर विभागातील बँकेच्या सभासदांना करून देण्यात आला. शेवटी मान्यवरांचे आभार समर्थ सहकार परिवर्तन पॅनल चे उमेदवार श्री. पंजाबराव जे. साबळे यांनी केले.