सरकारी नोकरीची मोठी संधी! NABARD मध्ये 162 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Written By LoksangharshPune
Published :
Development Assistant पदांसाठी 162 जागा जाहीर. ऑनलाईन अर्ज 17 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026. पगार ₹32,000 पासून.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) मार्फत Development Assistant व Development Assistant पदांसाठी एकूण 162 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 17 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, इच्छुक उमेदवार 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
ही भरती बँकिंग व ग्रामीण विकास क्षेत्रात स्थिर सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यांत होणार असून, सुरुवातीचा पगार सुमारे ₹32,000 आहे. अर्ज, पात्रता व परीक्षा तपशीलासाठी उमेदवारांनी www.nabard.org
या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठातून)
- किमान 50% गुण
- (SC/ST/PwBD/माजी सैनिकांसाठी फक्त उत्तीर्ण)
वयोमर्यादा
- किमान वय: 21 वर्षे
- कमाल वय: 35 वर्षे
- शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू



