गडचिरोलीत आंब्याच्या झाडाची अनोखी फळधार; एका घडात 15 ते 20 आंबे
Written By LoksangharshGadchiroli
Published :
एका घडात 20 आंबे! गडचिरोलीतील या झाडाची फळधार पाहून सर्वच थक्क

गडचिरोली जिल्ह्यातील मुरखळा गावात एक अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. सौ. निशाताई शशिकांत नागोशे यांच्या घरातील सुमारे 20 ते 25 वर्षे जुन्या आंब्याच्या झाडाला यंदा मोठ्या प्रमाणात फळधार आली असून, एका घडात तब्बल 15 ते 20 आंबे दिसत आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण फळधारीमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी या झाडाला पाहण्यासाठी भेट देत आहेत.
नागोशे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, झाडाची नियमित निगा राखली जाते आणि वेळेवर पाणी दिले जाते. मात्र, यापूर्वी अशा प्रकारे आंब्यांचे घोस कधीही दिसले नव्हते. त्यामुळे हे झाड सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.



