आजपासून (१८ ऑक्टोबर २०२५) दिवाळीपूर्वी मिळणार ₹27,००० अनुदान — लवकरच दुष्काळ निधी येऊ शकतो शेतकऱ्यांच्या खात्यात
Written By LoksangharshNashik
Updated :
अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; पंजाब सरकारने हेक्टरी ५० हजार अनुदान जाहीर केले आहेत, महाराष्ट्र सरकारने 27 हजार अनुदान जाहीर केले.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे उत्पादन घटले असून राज्य सरकारकडून नुकसानीचा आढावा सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आजपासून (१८ ऑक्टोबर २०२५) अंदाजे ₹27,००० अनुदान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शासनाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुष्काळ निधीसाठी देखील प्रस्ताव पाठविण्यात आला असून, लवकरच हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.