प्राथमिक शिक्षणात राष्ट्रिय शैक्षणिक धोरणाची महत्त्वाची भूमिका
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण अधिक समावेशक, सुसंगत व गुणवत्तापूर्ण झाले आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने शिकवणी आकर्षक झाली असून, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सहकार्य व संवाद कौशल्ये वाढली आहेत. शिक्षक मार्गदर्शक बनले आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारून भविष्य उज्ज्वल होत आहे.

"शिक्षण हे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहे. प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, कारण शिक्षणाचं सामर्थ्य एक संपूर्ण देश बदलू शकते"
- पंडित जवाहलाल नेहरू
शिक्षण हे कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असते. भारतात शिक्षणक्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) लागू करण्यात आले आहे. हे धोरण प्राथमिक स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर परिणामकारक ठरत असून, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी निर्माण करत आहे.मी एक प्राथमिक शिक्षिका म्हणून या बदलांची साक्षीदार आहे. शिक्षण धोरणामुळे शिक्षण अधिक समावेशक, सुसंगत आणि गुणवत्तापूर्ण झाले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार शिकवण्याची संधी मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास व लक्ष वाढले आहे.
तंत्रज्ञानाचा वापर या धोरणाची खासियत आहे. व्हिडिओ, ऑनलाइन सामग्री, इंटरेक्टिव्ह टूल्स यांच्या मदतीने शिकवणी अधिक आकर्षक व प्रभावी झाली आहे. यामुळे विद्यार्थी सक्रियपणे शिकतात व ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करण्यास शिकतात.विद्यार्थ्यांमध्ये गटकार्य आणि सहकार्याची भावना विकसित झाली आहे. एकत्र काम करताना ते एकमेकांचे विचार समजून घेतात व सामाजिक विकास साधतात.शिक्षकाची भूमिका केवळ ज्ञान देणाऱ्या व्यक्तीवरून मार्गदर्शक व प्रेरणादायी व्यक्ती अशी बदलली आहे. या धोरणामुळे शिक्षकांना नवीन तंत्र शिकवण्याच्या संधी मिळाल्या असून, विद्यार्थ्यांशी संवाद अधिक प्रभावी झाला आहे.
शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासावरही भर दिला जात आहे. जीवनातील अडचणींवर मात करण्याची क्षमता विकसित होत असून, विद्यार्थी जबाबदार नागरिक बनत आहेत.या धोरणामुळे शिक्षणाला एक नवी दिशा मिळाली आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतांची ओळख करून योग्य मार्गाने प्रगती करू शकतो. शिक्षणाची गुणवत्ता वाढवून, हे धोरण विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यास मदत करत आहे.
एक शिक्षिका म्हणून मला जाणवते की, या धोरणामुळे वर्ग अधिक गतिमान झाला आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील नवनिर्मितीचा आनंद पाहून माझा आनंदही वाढतो. NEP मुळे शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल झाले आहेत, ज्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीकोनावर, तसेच देशाच्या भविष्यात, स्पष्ट दिसून येतो.
मनिषा बबन बोरकर : प्राथमिक शिक्षिका
एम. पी. एस. देवनार कॉलनी इंग्रजी शाळा क्रमांक-१ टाटानगर, गोवंडी, मुंबई.
भ्रमणध्वनी: ९८३३७७०५४२