LOKसंघर्षलोकसंघर्ष - सत्य सांगणारं, एकमेव विश्वसनीय वृत्तपत्र
लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज उपलब्ध नाहीत

गावात आता रोज वाढदिवस! कारण ग्रामपंचायत निवडणूक जवळ आलीय

Written By LoksangharshUpdated:Maharashtra

गावात वाढदिवसांचा सीझन सुरू – निवडणूक समीप आली कीच आठवतात मतदार!

गावात आता रोज वाढदिवस! कारण ग्रामपंचायत निवडणूक जवळ आलीय

गावात निवडणुकीचा माहोल तापायला लागलाय. ग्रामपंचायत निवडणुकीला अजून सहा महिने बाकी आहेत, पण उमेदवारांनी आत्तापासूनच आपला प्रचार सुरू केला आहे. गावातल्या छोट्या-मोठ्या प्रत्येक मतदाराचा वाढदिवस आता खास बनलाय.

कालपर्यंत कुणालाच आठवत नसलेले वाढदिवस आता उमेदवारांच्या डायरीत नोंदवले जात आहेत. कुठे केक कापला जातोय, कुठे फुगे लावले जात आहेत तर कुठे बँडबाजा घेऊन मिरवणुका काढल्या जात आहेत. गावात जणू दररोज एखाद्या सेलिब्रिटीचा बर्थडे पार्टी असल्यासारखा माहोल तयार झालाय.

हातात फुलांचा गुच्छ, खांद्यावर शाल, गळ्यात हार आणि कानावर निवडणुकीचे वायदे – मतदारांचा वाढदिवस उमेदवारांसाठी आता सोन्याची संधी ठरतोय. गावकरीही हसतायत की, “आमचा वाढदिवस इतक्या प्रेमाने आधी कधीच साजरा झालाच नव्हता. ही निवडणूक रोज यावी तर!”

Share this news

Related News